Fri, Jul 19, 2019 17:44होमपेज › Vidarbha › संभाजी भिडे, एकबोटेंसमोर सरकार झुकले : प्रकाश आंबेडकर

संभाजी भिडे, एकबोटेंसमोर सरकार झुकले : प्रकाश आंबेडकर

Published On: Jan 17 2018 10:27AM | Last Updated: Jan 17 2018 1:27AM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे दोघांवरही अजामीनपात्र गुन्हे दाखल आहेत. हे दोघेही भीमा-कोरेगाव येथील हिंसाचाराला जबाबदार आहेत, असे असतानाही सरकार त्यांना अटक करत नाही. सरकार या दोघांपुढे झुकले आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली. महाराष्ट्र बंद आंदोलनानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून कार्यकर्त्यांची धरपकड केली. पोलिसांना कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचा अधिकार नाही, याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

भारतात दोन प्रकारच्या हिंदू संघटना आहेत, त्यातली एक संघटना लोकांमध्ये जाते, तर दुसरी आपले मत लोकांवर लादत असते. ही दुसरी संघटना आता हिंसाचारावर उतरली आहे आणि हिंदूंनाच मारण्यास सुरुवात केली आहे. भारतात प्रत्येक राज्यात अशाप्रकारचे हाफिज सईद आहेत, असा घणाघात आंबेडकर यांनी केला.  भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप ही समिती नेमण्यात आली नाही, असेही आंबेडकर म्हणाले.