Sat, Sep 22, 2018 20:26होमपेज › Vidarbha › मुख्यमंत्र्यांच्या धमकीला घाबरत नाही : सुप्रिया सुळे

मुख्यमंत्र्यांच्या धमकीला घाबरत नाही : सुप्रिया सुळे

Published On: Dec 13 2017 1:13PM | Last Updated: Dec 13 2017 1:13PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या 3 वर्षांपासून फक्‍त धमकी देण्याचेच काम करीत आहेत. धमकी देण्यासाठी त्यांनी जो वेळ घातला तो सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी दिला, तर त्यांचे तरी भले होईल, मुख्यमंत्र्यांच्या धमकीला मी घाबरत नाही, असा सनसनाटी टोला राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आज लगावला.

हल्लाबोल आंदोलन करणार्‍यांचे डल्लाबोल पुरावे आपल्याकडे आहेत, असा धमकीवजा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या वक्‍तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री गेल्या तीन वर्षांपासून फक्‍त धमकी देण्याचेच काम करीत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी असली वक्‍तव्ये शोभून दिसत नाहीत. त्यांच्या धमकीला मी घाबरणारी नाही. त्यांनी अशा धमक्या देणे बंद करावे, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांना उत्तर दिले.