Tue, Mar 26, 2019 07:38होमपेज › Vidarbha › ‘राजकारण्यांची स्थिती रमीतील जोकरसारखी’

‘राजकारण्यांची स्थिती रमीतील जोकरसारखी’

Published On: Jan 06 2018 10:30AM | Last Updated: Jan 06 2018 10:30AM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

सध्या देशातील राजकारण्यांची स्थिती रमीच्या खेळातील जोकरसारखी झाली आहे. रमीच्या खेळात ‘जोकर’ जसा कुठेही फिट करता येतो, तसेच राजकारण्यांचे झाले आहे, असे विधान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एका कार्यक्रमात केले आहे. पेडीकॉन या बालरोग तज्ज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला देशातील नामवंत बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थी डॉक्टर किंवा इंजीनिअर होतात. या क्षेत्रात ते कुशल असले तरी इतर क्षेत्रात यशस्वी होतातच, असे नाही. परंतु राजकारणात दोन-तीनवेळा अनुत्तीर्ण होऊनही राजकारणी नेते मंत्री होतात. राजकारणी हे कोणत्याही क्षेत्राचे मंत्री होतात. त्यांना या क्षेत्राचे ज्ञान आहे किंवा नाही, याची काहीही माहिती नसते. रमीच्या खेळात जोकर ज्याप्रमाणे लावला जातो. त्याप्रमाणे राजकारण्यांना कोणत्याही क्षेत्राचे मंत्री केले जाते, असेही ते म्हणाले. डॉक्टर, इंजीनिअर व इतर क्षेत्रातील लोकांकडून राजकारणी करून घेतात. मंत्री किंवा राजकारणी होण्यासाठी कोणत्याही शिक्षणाची गरज राहत नाही, असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. डॉक्टरांचे असे नाही. त्यांना विद्वतेसोबत सामाजिक दायीत्वही सांभाळावे लागते, असेही ते म्हणाले.