Sun, Jul 21, 2019 09:52होमपेज › Vidarbha › पराभवाच्या भीतीने पोटनिवडणूक घेण्यासाठी विलंब: नाना पटोले

पराभवाच्या भीतीने पोटनिवडणूक घेण्यासाठी विलंब: नाना पटोले

Published On: Mar 17 2018 10:14AM | Last Updated: Mar 17 2018 10:14AMनागपूर : प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फूलपूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. या दोन्ही भागातील खासदारांसोबतच माझाही राजीनामा मंजूर झाला होता. तरी या 2 जागांवर आधी पोटनिवडणूक झाली, मग महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक का नाही? अशी तक्रार काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीने पोटनिवडणूक घेण्यासाठी विलंब केला जात आहे. जर, भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होईल. म्हणून येथील पोटनिवडणूक घेण्यास विलंब केला जात आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

Tags : Nana Patole, Gondia-Bhandara Lok Sabha constituency, by-election