Thu, Jul 18, 2019 02:06होमपेज › Vidarbha › ‘फडणवीस सरकार संक्रांतीपूर्वी कोसळणार’

‘फडणवीस सरकार संक्रांतीपूर्वी कोसळणार’

Published On: Dec 24 2017 9:43AM | Last Updated: Dec 24 2017 9:43AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

संक्रांतीपूर्वी राज्यातील फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे भाकीत भारतीय जनता पक्षाचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी केले आहे. यवतमाळ येथे शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीच्या वतीने शनिवारी त्यांचा रुमणे देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही पटोले यांनी घणाघाती आरोप केले आहेत. मोदी यांच्या वर्तणुकीचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, मोदी हे सतत रेटून खोटे बोलणारे आहेत. शेतकरी, बहुजन समाज व दुर्लक्षित घटकांना ते सतत खोटी आश्वासने देत असतात. त्यांच्याकडून हे वर्तन सतत घडत असल्याने आपली फसगत झाली. या खोटारड्या सरकारमध्ये राहून काय उपयोग? म्हणून शेवटी खासदारकीचा राजीनामा दिला व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनात उतरलो, असे पटोले पुढे म्हणाले.