Sun, Aug 25, 2019 04:00होमपेज › Vidarbha › यशवंत सिन्हा यांना अकोल्यात अटक

यशवंत सिन्हा यांना अकोल्यात अटक

Published On: Dec 05 2017 2:00AM | Last Updated: Dec 05 2017 1:52AM

बुकमार्क करा

नागपूर ः प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक आंदोलन पुकारणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर सोमवारी अकोला पोलिसांनी अकोल्यात अटकेची कारवाई केली.

शेतकर्‍यांच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत मोर्चातून हलणार नसल्याचा इशारा देत यशवंत सिन्हा व रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, तोडगा निघाला नाही. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू व भाजपचे खा. नाना पटोले हे आंदोलनात दिसले नाहीत.