Sat, Feb 16, 2019 20:57होमपेज › Vidarbha › मुंबईसह राज्यात पाणी महागले

मुंबईसह राज्यात पाणी महागले

Published On: Feb 21 2018 1:19AM | Last Updated: Feb 21 2018 1:09AMनागपूर : प्रतिनिधी

राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असतानाच राज्य शासनाने पाण्याचे दर वाढवून नागरिकांच्या खिशाला आणखी एक दणका दिला आहे. आधीच वाढत्या महागाईत लोकांचे बजेट बिघडले असून, आता या महागाईत भर पडली आहे ती पाण्याच्या दरवाढीची. मुंबई, नागपूरसह राज्यात सर्व महानगरपालिकांत तब्बल 19 टक्के पाण्याची दरवाढ करण्यात आली आहे.

नुकतेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्यात पाणी दरवाढीला मान्यता दिली. त्यानुसार  राज्यात सर्वत्र पिण्याच्या पाण्यात तब्बल 19 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. तर औद्योगिक वापरासाठी लागणारे पाणी तब्बल 50 टक्क्यांंनी महागले. सर्वाधिक दरवाढ ही पाणी कच्चा माल म्हणून वापरणार्‍या मिनरल वॉटर प्लांट आणि बीअरच्या कंपन्यांसाठी तब्बल 712 टक्के करण्यात आली.

पिण्यासह घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी लागणार्‍या पाण्याची दरवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू झाली. शेतीला सिंचनासाठी लागणार्‍या पाण्याच्या दरातही किंचित वाढ करण्यात आली आहे. सिंचनाची दरवाढ 2018 च्या उन्हाळी हंगामापासून लागू होणार आहे.