Sun, Nov 18, 2018 17:40होमपेज › Vidarbha › नागपूर : नागपुरात तिघांची आत्‍महत्‍या

नागपूर : नागपुरात तिघांची आत्‍महत्‍या

Published On: Jul 08 2018 6:54PM | Last Updated: Jul 08 2018 6:55PMनागपूर : प्रतिनिधी

नागपुरात दोन तरुणींसह तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली. यातील एका व्येीची ओळख पटलेली नाही.  नागपूरच्या अजनीतील रामेश्वरीत राहणारी दीपाली कैलास रगडे (वय  21) हिने शनिवारी सकाळी 11 ते 11.30 च्या सुमारास गळफास लावूनआत्महत्या केली. ती मूळचीवरुड येथील जागृती शाळेजवळची रहिवासी होती. तिची आई शांता कैलास रगडे यांनी दिलेल्या माहितीवरुन  अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

अशाच प्रकारे कळमन्यातील गुलमोहरनगर, गिरनार बँकेच्या मागे राहणारी  खिल्लेश्वरी राजू शाहू (वय 20) हिने शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. राजू हेमू शाहू (वय 45) यांनी दिलेल्या  तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.   गणेशपेठेतील लोधीपुर्‍यात 321 क्रमांकाच्या घरात राहणार्‍या  एका व्‍यक्‍तीनेगळफास लावून आत्महत्या केली.
शनिवारी सकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हेमराज शंभू सरोज (वय 73) यांनी दिलेल्या माहितीवरुन गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.