Mon, May 20, 2019 10:05होमपेज › Vidarbha › अजित पवारांचा ट्रॅक्‍टर चालवत 'हल्‍लाबोल'(व्‍हिडिओ)

अजित पवारांचा ट्रॅक्‍टर चालवत 'हल्‍लाबोल'(व्‍हिडिओ)

Published On: Dec 05 2017 4:08PM | Last Updated: Dec 05 2017 4:08PM

बुकमार्क करा

वर्धा : पुढारी ऑनलाईन

राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यव्यापी हल्‍लाबोल आंदोलन सुरू आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्‍हाण यांच्या कराड येथील प्रीतिसंगम या स्‍मृतीस्‍थळापासून सुरू झालेले हे आंदोलन नागपूर येथील विधानभवनावर धडकणार आहे. आंदोलनात भजन, आदिवासी नृत्य, फुगडी, सामूहिक भोजन, सभा, शेतकर्‍यांच्या भेटीगाठी आदींसारख्या मार्गांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्‍न सुरू आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्रॅक्‍टर चालवत आंदोलनाचे नेतृत्‍व केले. तर सोमवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी आदिवासी नृत्यावर ताल धरला. अजितदादांचे ट्रॅक्‍टर चालवणे कार्यकर्त्यांच्या औत्‍सुक्याचा विषय ठरत आहे. हा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. 

राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत आहे. शेतकर्‍यांसाठी सरकारचे धोरण पुरक नाही, असा आरोप करत राष्‍ट्रवादी काँग्रेस पदयात्रेतून राज्यभर आंदोलन करत आहे. आज, मंगळवारी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी पदयात्रा वर्धा जिल्‍ह्यात पोहोचली आहे. हल्‍लाबोल आंदोलनात माजी मुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्‍ट्रवादीचे नेते सहभागी झाले आहेत.