Tue, Apr 23, 2019 21:56होमपेज › Vidarbha › मशरूम व्यवसायातून लाखोचा स्वयंरोजगार!

मशरूम व्यवसायातून लाखोचा स्वयंरोजगार!

Published On: Sep 06 2018 1:43AM | Last Updated: Sep 05 2018 7:53PMनागपूर : प्रतिनिधी

जिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावरच यश मिळते हे प्रमोद सोनुने आणि कैलास कदम या दोन युवकांनी मशरूम (अळींबी) शेतीतून सिद्ध केले आहे. वाशीम जिल्ह्यातील प्रमोद आणि कैलास या दोघांच्याही घरची परिस्थिती हलाखीची. शिक्षण घेत असताना प्रचंड अडचणी यायच्या. शिक्षणासाठी वेळोवेळी पैसा मिळायचा नाही. कसेबसे दोघांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. अशातच मशरूम शेती करण्याचे प्रशिक्षण पंचाळ येथील मोरे यांनी माहिती दिले. या युवकांना क्षणाचांही विलंब न लावता दोघांनीही वाशीम येथे मशरूम प्लांटचे प्रशिक्षण घेण्याचा विचार मनात पक्का केला.

मशरूम व्यवसायाची सर्व माहिती या दोघा युवकांनी जाणून घेतली. आधुनिक शेतीचे धडे घेतले. मशरूम लागवड करण्यासाठी उन लागू नये, म्हणून मोठ्या शेडची आवश्यकता होती. प्रमोद सोनुने यांच्याकडे १५०० स्वेअर फूटप्लॅाट राहत्या घराजवळ मशरूम शेतीसाठी जागा निवडली.मशरूम लागवड करण्यासाठी एका प्लॉस्टिकमध्ये कुटार घेवून एकमेकांवर रथर तयार केले. मशरुम 25 ते 45 दिवसांचे उत्पादन असून तीनदा तोडणी करता येते. ग्रामीण भागात मशरूमची विशेष मागणी नाही. पण, शहरीभागातील हॉटेल, रेस्टॉरेंटमध्ये मशरुमला मोठी मागणी आहे. व्यावसायिक हेतू ठेवून दोघांनीही योग्य नियोजन केले.

मशरूमचा दरसध्या प्रती किलो 250 रुपये आहे. कमी खर्चात चांगले पीक घेता येते.केवळ पारंपरिक शेती न करताना परसबाग अथवा घरातील एका खोलीचमशरूम शेती सहजपणे करता येते. शासनाने विक्रीची व्यवस्था करावी,अशी मागणी प्रमोद सोनुने व कैलास कदम यांनी केली. मशरूम गुणकारीमशरूम (अळींबी) मध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आहेत. मशरूमचाआहारात वापर केल्यास शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गॅस, अँसिडीटीदूर करते. मशरूम सेवण केल्याने मधूमेह, रेदाब व हृदयविकार नियंत्रणात ठेवता येतो.