Fri, Nov 16, 2018 02:25होमपेज › Vidarbha › नाना पटोले यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

नाना पटोले यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

Published On: Dec 08 2017 1:25PM | Last Updated: Dec 08 2017 1:25PM

बुकमार्क करा

नागपूर: पुढारी ऑनलाईन

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. पटोले यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.  

काँग्रेसला 2008मध्ये रामराम करत पटोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर त्यांनी उघडपणे नाराजी टीका केली होती. पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी टीका केली होती.