Thu, May 23, 2019 20:26
    ब्रेकिंग    होमपेज › Vidarbha › नागपूर: मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर: मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Feb 11 2018 12:27PM | Last Updated: Feb 11 2018 12:38PMनागपूर : पुढारी ऑनलाईन

नागपूर महानगरपालिकेच्या सेवेतून बडतर्फ केलेल्या चार कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रालयात झालेल्या आत्महत्येच्या घटना ताज्या असताना आता थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे.

नागपूरमधील 'रामगिरी' या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर सकाळी हा प्रकार घडला. या चौघांना 2002मध्ये पालिकेतून बडतर्फ केले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेतले नाही. पुन्हा सेवेत घेण्यासाठी या चौघांनी आत्महत्येचा इशारा दिला होता. 

रविवारी सकाळी सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ आलेल्या या चौघातील एकाने अचानक रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला रोखल्याने मोठा अनर्थ टळला.