Tue, Apr 23, 2019 01:37होमपेज › Vidarbha › शेट्टींचे आंदोलन निवडणुकीसाठी; सदाभाऊंचा आरोप

शेट्टींचे आंदोलन निवडणुकीसाठी; सदाभाऊंचा आरोप

Published On: Jul 16 2018 1:35PM | Last Updated: Jul 16 2018 1:35PMनागपूर : पुढारी ऑनलाईन

स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दूध दरवाढ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टींवर निशाणा साधला आहे.

आगामी लोकसभा निवडणुका ठेवून शेट्टी आंदोलन करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आम्ही निश्चितच त्यांना न्याय देऊ. पण सध्या जे आंदोलन सुरू आहे; ते शेतकऱ्यांसाठी नसून एका व्यक्तीसाठी आहे, असे मंत्री खोत यांनी म्हटले आहे.

रस्त्यावर फेकून दिलेल्या दुधात पाणी आहे, असाही दावा त्यांनी केला आहे.