Sat, May 30, 2020 14:21होमपेज › Vidarbha › ‘तबलिगी’च्या कार्यक्रमातून परतलेले विदर्भातील ६० जण क्वारंटाईनमध्ये

‘तबलिगी’च्या कार्यक्रमातून परतलेले विदर्भातील ६० जण क्वारंटाईनमध्ये

Last Updated: Apr 01 2020 6:57PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

नवी दिल्ली येथील निजामुद्दीन भागातील ‘तबलिगी ए जमाते’च्या ‘मरकज’मधील धार्मिक कार्यक्रमात विदर्भातील ११ जिल्ह्यांतून १०० हून अधिक मुस्लिम बांधव सहभागी झाले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. यापैकी ५० ते ६० जण विदर्भाच्या नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, अकोला, वर्धा या जिल्ह्यात परतले आहेत. तर अद्यापही चाळीस ते पन्नास जण अद्याप परतायचे आहेत. जे नागरीक दिल्लीहून परत आले आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. नागपुरातून ६० हून अदिक नागरिक दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी झाले असल्याची प्रशासनाची माहिती आहे. 

दरम्यान, नवी दिल्लीच्या कार्यक्रमातून नागपुरात ५४ जण परत आले आहेत अशी माहिती नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. या संशयीताना शोधून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर जे नागरिक दिल्लीच्या कार्यक्रमात गेले होते त्यांनी स्वतः हून प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे. दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्यांची माहिती गोळा करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, प्रशासनाच्या नजर चुकीने कोणी राहिले असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे येण्याचे आवाहन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. दरम्यान, अमरावती येथूनही ९ जण दिल्ली येथे गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी परतलेल्या पाच जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या पाचही जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

अकोल्यातील १० जण...

दिल्ली येथील येथील तबलिग-ए- जमातमध्ये अकोल्यातील १० जण सहभागी झाल्याची माहिती आहे. या ९ जणांना पोलिसांनी शोध घेतला असून यामधील चौघांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. अकोल्यातून दिल्लीला गेलेल्या ९ जणांपैकी ४ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी तिघांना घराच्या बाहेर निघण्यास मज्जाव करण्यात आला आहे.