Sat, Nov 17, 2018 19:13होमपेज › Vidarbha › भंडारा-गोंदियात राष्‍ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी

भंडारा-गोंदियात राष्‍ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी

Published On: May 31 2018 8:06PM | Last Updated: May 31 2018 8:06PMभंडारा : पुढारी ऑनलाईन

लोकसभेच्या भंडारा-गोंदिया मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्‍ट्रवादी काँग्रेसने भाजपचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. राष्‍ट्रवादीचे मधुकरराव कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांच्यावर ४८ हजार ९७ मतांनी विजय मिळविला. हेमंत पटलेंना ३ लाख ८६ हजार मते मिळाली.

आज देशभरातील चार लोकसभा निवडणुकांसाठी मतमोजणी झाली. राज्यात दोन लोकसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली. पूर्वी या दोन्‍ही जागा भाजपकडे होत्या. पैकी पालघरची जागा राखण्यात भाजपला यश आले. परंतु, भंडारा गोंदियाच्या जागेवर भाजपाला नामुष्‍की पत्‍करावी लागली. 

दरम्यान, मधुकर कुकडे यांना उमेदवार असूनही मतमोजणी केंद्रावर जाण्यास रोखल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधित अधिकार्‍यांनी माफी मागावी अन्यथा खासदारकीच्या निवडीचे पत्र घेणार नसल्याचे कुकडे यांनी सांगितले. 

भाजपशी बिनसल्यानंतर नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भंडरा गोंदियाची जागा रिक्‍त झाली होती. त्यानंतर पटोलेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. .