Sun, Jun 16, 2019 11:58
    ब्रेकिंग    होमपेज › Vidarbha › नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून विधीमंडळ कामकाज ठप्प

'नाणार'वरून विधीमंडळ कामकाज ठप्प

Published On: Jul 13 2018 3:32PM | Last Updated: Jul 13 2018 6:11PMनागपूर : पुढारी ऑनलाईन

नाणार (जि. रत्नागिरी) येथील मेगा रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून आज विधीमंडळाचे कामकाज तहकूब झाले. नाणार येथील मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांना विश्वासात घेऊन व चर्चा करुनच याबाबत निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. 

तरीही या प्रकल्पाच्या मुद्दा आज विरोधक आणि शिवसेनेने उचलून धरला. हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी करत विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. यामुळे कामकाज तहकूब करावे लागले.
सहावीच्या मराठी पुस्तकातील दोन पाने गुजरातीमध्ये प्रसिद्ध झाल्याचाही मुद्दा विधीमंडळात उपस्थित करण्यात आला. या मुद्यावरून कामकाज काहीवेळ तहकूब झाले.