होमपेज › Vidarbha › बच्चू कडू यांना धमकी देणार्‍यावर हल्ला

बच्चू कडू यांना धमकी देणार्‍यावर हल्ला

Published On: Dec 07 2017 1:45AM | Last Updated: Dec 06 2017 8:19PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

आ. बच्चू कडू यांना फोनवर धमकी देणार्‍या अमरावती येथील मनसेचा जिल्हाध्यक्ष संतोष बद्रे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. बद्रे याच्या अपहरणाच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी एक किलोमीटर अंतरावर थांबविले. पोलिसांनी बद्रे यांची सुटका केली तर तुषार पुंडकर नावाच्या व्यक्‍तीला रंगेहाथ पकडले. अत्यंत व्यस्त अशा जनता चौकात घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ माजली आहे.