Tue, Apr 23, 2019 13:32होमपेज › Vidarbha › लोकसभा, विधानसभा एकत्र नाहीत : दानवे

लोकसभा, विधानसभा एकत्र नाहीत : दानवे

Published On: Jul 15 2018 1:39AM | Last Updated: Jul 15 2018 1:36AMनागपूर : प्रतिनिधी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होणार नसल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी अमरावती येथे दिले. 

आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष समविचारी पक्षांसोबत युती करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. दानवे म्हणाले की, भाजपला हरविण्याकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जी महाआघाडी तयार होणार आहे, त्यात लवकरच बिघाडी होणार आहे. तर पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच भविष्यातील पक्षपातळीवरच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन भाजप संपूर्ण राज्यभरात करणार आहे.