Thu, Jun 27, 2019 14:31होमपेज › Vidarbha › लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा नाही : तावडे 

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा नाही : तावडे 

Published On: Jul 13 2018 12:52AM | Last Updated: Jul 13 2018 12:42AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा किंवा अल्पसंख्याक दर्जा देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. केंद्र सरकारच्या पत्रानुसार वीरशैव, लिंगायत हा हिंदू धर्माचा पंथ असल्याचे म्हटले आहे. तसेच सन 2011 च्या जनगणनेमध्ये लिंगायत समाजाची स्वतंत्र नोंदही घेण्यात आलेली नाही, असे नमूद करून अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे यांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास नकार दिला आहे.

लिंगायत समाजाने आपल्या मागणीसाठी कोल्हापूरसह राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले. मात्र, त्यांची मागणी अद्यापही प्रलंबित असल्याबाबत आमदारांनी विचारणा केली होती. तसेच या मागण्यावर सरकारने कोणती कार्यवाही केली, असा ही प्रश्‍न या आमदारांनी केली असता, त्यावर विनोद तावडे यांनी लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केल्याचे मान्य केले आहे.