Thu, Jul 18, 2019 02:04होमपेज › Vidarbha › ‘न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने’

‘न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने’

Published On: Jan 17 2018 8:27AM | Last Updated: Jan 17 2018 8:27AM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

न्यायमूर्ती ब्रिजमोहन हरकिशन लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच झाला. त्यांच्या मृत्यूची नागपूर पोलिसांनी चौकशी केली असून, शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची आणखी चौकशी करण्याची गरज नाही. त्यामुळे लोया मृत्यू प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली, अशी माहिती नागपूर सहपोलीस आयुक्‍त शिवाजी बोडखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची देशभर चर्चा होत आहे. 1 डिसेंबर 2014 ला त्यांचा नागपुरात मृत्यू झाला. 4 वर्षांनंतर न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका व्यक्‍त केल्या जात आहेत; पण नागपूर पोलिसांनी सर्व बाबी नाकारल्या आहेत.