Mon, Mar 25, 2019 13:53होमपेज › Vidarbha › टायगर अभी जिंदा है! पाहा 'जयचंद'चा थरार

टायगर अभी जिंदा है! पाहा 'जयचंद'चा थरार

Published On: Jan 11 2018 1:31AM | Last Updated: Jan 11 2018 12:35PM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्यातील उमरेड कर्‍हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध वाघ जय हा गेल्या अडीच वर्षांपासून बेपत्ता आहे. जय आणि चांदणीचा मुलगा म्हणून ओळखला जाणारा जयचंद आज गोसीखुर्दच्या कालव्यात पडला. गुराख्याच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले. 

प्रसिद्ध रुबाबदार जयचंद बुधवारी गोसेखुर्द उजव्या कालव्यात पडल्याने वन्यजीवप्रेमींच्या हृदयाचे ठोके चुकले होते. मात्र, वन खात्याने अत्यंत काळजीपूर्वक त्याला बाहेर काढल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यापूर्वीही कातलाबोडी शिवारातील एका विहिरीत वाघीण पडल्याची घटना घडली होती. जय वाघाच्या रहस्यमय बेपत्ता होण्यानंतर उमरेड-कर्‍हांडला अभयारण्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती.

पण अलीकडे जयचा छावा जयचंदमुळे पर्यटकांचा ओढा उमरेड-कर्‍हांडलाकडे वाढला आहे. तरणाबांड व देखणा जयचंद पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास पाणी पिण्यासाठी म्हणून तो गोसेखुर्दच्या कालव्याकडे आला. मात्र, तेथील शेवाळामुळे त्याचे पाय घसरत होते. त्यातच तोल जाऊन तो पाण्याने भरलेल्या कालव्यात पडला. ही माहिती एका गुराख्याने वनविभागाला दिली. तोपर्यंत ही बातमी वार्‍यासारखी पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी दादा राऊत तसेच बारई यांनी घटनास्थळी धाव घेऊन जयचंदला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. तब्बल अडीच तास जयचंद पाण्यात पोहोत होता.