होमपेज › Vidarbha › ​​​​​​​‘जय जवान जय किसान’ संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचा मृत्यू 

​​​​​​​‘जय जवान जय किसान’ संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचा मृत्यू 

Published On: Jun 04 2018 3:11PM | Last Updated: Jun 04 2018 3:20PMनागपूर : पुढारी ऑनलाईमन

‘जय जवान जय किसान’ संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते नागपूरच्या प्रजापतीनगरमध्ये आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात रस्त्यावर दूध ओतण्यावरून खेडीकर आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती.  

आंदोलनात सहभागी होण्यासाठी खेडीकर सकाळी ११ च्या सुमारास प्रजापतीनगरमध्ये गेले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत उभे असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. कार्यकर्त्यांनी जवळच असणाऱ्या रूग्णालयात खेडेकर यांना नेले. पण, डॉक्टरांनी खेडीकर यांना मृत घोषित केले. 

आंदोलनात सहभागी झाल्याने ऊनाचा त्रास आणि धावपळ यामुळे खेडीकर यांना त्रास झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.पण, वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच सर्वकाही स्पष्ट होईल.