Sat, Sep 22, 2018 05:01होमपेज › Vidarbha › सिंचन घोटांळा ४ गुन्हे दाखल; बडे नेते अडचणीत

सिंचन घोटांळा ४ गुन्हे दाखल; बडे नेते अडचणीत

Published On: Dec 12 2017 8:57PM | Last Updated: Dec 12 2017 8:58PM

बुकमार्क करा


नागपूर : प्रतिनिधी

बहुचर्चित सिंचन घोटाळाप्रकरणी आज नागपूरच्या लाचलूचपत प्रतिबंध विभागाने चार गुन्हे दाखल केले आहेत. गोसीखुर्द प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अभियंते,अधिकारी व कंत्राटदार यांचेवर हे गुन्हे दाखल झाले आहे. अधिक तपास सुरु असल्याची माहिती नागपूर एसीबीचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली. गुन्हे दाखल झाल्याने आघाडी सरकारमधील बडे नेते गोत्यात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

राज्यभरात गाजलेल्या सिंचन घोटाळ्यात कोणत्या राजकीय बड्या नेत्यांची नावे येतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. मुळात आजच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नागपुरात हल्लाबोल मोर्चा काढला होता. तर  काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्ट नेत्यांविरोधात मोठे पुरावे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता सिंचन घोटाळा प्रकरणी कोणते मोठे मासे गळाला लागणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.