Mon, Apr 22, 2019 11:49होमपेज › Vidarbha › मुंबईत खड्डे बुजविण्यासाठी आयआयटीची मदत : मुख्यमंत्री

मुंबईत खड्डे बुजविण्यासाठी आयआयटीची मदत : मुख्यमंत्री

Published On: Jul 11 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 12:47AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आयआयटीसारख्या नामांकित संस्थाची मदत घेण्यात येईल व दरवर्षी निर्माण होणारी खड्डयांची समस्या दूर करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला दिल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. 

भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासात मुंबईत दरवर्षी रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले की,मुंबईत 1 हजार 941 किलोमीटरलांबीचे रस्ते असून त्यात 1200 किमी लांबीचे रस्ते हे डांबरी आहेत. यापैकी 605 रस्ते हे डिफेक्ट लायबलिटीच्या (कंत्राटदाराची जबाबदारी) खाली आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी यावर्षी साडेनऊ कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने विशिष्ट रसायने वापरुन नवीन पद्धतीचे मिश्रण तयार केले आहे. ते पावसात देखील वापरता येते. तसेच बुजविलेले खड्डे पावसाळ्यात टाकावेत म्हणून डांबर मिश्रीत खडीची चाचणी घेण्यात आली आहे. या खडीचे उत्पादन महापालिकेच्या मालकीच्या अस्फाल्ट संयंत्रातून करण्याकरिता त्यात योग्य असे बदल करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.