Fri, Jul 19, 2019 15:42होमपेज › Vidarbha › हावडा-मुंबई इंजिनच्या आगीत चालक ठार

हावडा-मुंबई इंजिनच्या आगीत चालक ठार

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 07 2018 1:43AMनागपूर : पुढारी वृत्तसेवा

रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईकडे येणार्‍या हावडा- मुंबई एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागून सहायक लोको पायलटचा मृत्यू तर लोको पायलट जखमी झाला. अमरावती जिल्ह्यात धामणगावजवळ हा प्रकार घडला.

इंजिनाला आग लागल्याचे लक्षात येताच सहायक लोको पायलट एस.के. विश्वकर्मा घाबरून गेले व जीव वाचवण्यासाठी त्यांनी थेट धावत्या गाडीतून उडी घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. लोको पायलट डी.ए. ब्रह्मे यांनी मात्र प्रसंगावधान दाखवत ब्रेक दाबून गाडी थांबवली. यात ब्रह्मे जखमी झाले आहेत. या आगीमुळे चालकाच्या केबिनमध्ये धूर पसरला. काही वेळातच गाडीच्या इंजिनाला लागलेली आग विझवण्यात आली. या गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.