Sun, Mar 24, 2019 04:54होमपेज › Vidarbha › कुटुंबातील प्रत्येकी व्यक्तीला मिळणार कर्जमाफीचा लाभ

कुटुंबातील प्रत्येकी व्यक्तीला मिळणार कर्जमाफीचा लाभ

Published On: Jul 20 2018 1:09PM | Last Updated: Jul 20 2018 1:09PMनागपूर : प्रतिनिधी

राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविली आहे. कर्जमाफी योजनेसाठी कुटुंबाची अट काढली असून आता व्यक्तिनिहाय कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी घोषणा आज सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत केली.

यापूर्वी कुटुंबातील एकाच व्यक्तीला दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ घेता येत होता. आता व्यक्तिनिहाय कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी पती- पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांपैकी एकालाच कर्जमाफीचा लाभ दिला जात होता. आता कुटुंबातील प्रत्येक खातेदाराला दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत दिली.