Mon, Nov 19, 2018 14:50होमपेज › Vidarbha › मुंबईत जाताय?, टोल द्यावाच लागणार!

मुंबईत जाताय?, टोल द्यावाच लागणार!

Published On: Dec 15 2017 1:01PM | Last Updated: Dec 15 2017 1:01PM

बुकमार्क करा

नाशिक: पुढारी ऑनलाईन

मुंबई प्रवेशद्वारावर टोल बंद करण्यासाठी सरकारला मोठी रक्कम लागणार आहे. यासंदर्भात अद्याप निर्णय झाला नसल्याने टोल सुरूच राहणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले. 

अनेक ठिकाणी सरकारच्या रस्ते विकास महामंडळाने छोट्या गाड्यांचा टोल बंद करताना 400 कोटी रुपये कंपन्यांना दिले आहेत. पण मुंबई प्रवेशद्वारावर टोल बंद करण्यासाठी सरकारला मोठी रक्कम लागणार आहे. त्यामुळे या संदर्भातील अहवाल राज्याच्या वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याचे पाटील म्हणाले. 

मुंबई प्रवेशद्वारावर असलेल्या पाच ठिकाणी टोल बंद करण्याचा निर्णय झालेला नाही. वित्त विभागाच्या अहवालातनंतरच निर्णय होण्याची शक्यता असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.