Sat, Jul 04, 2020 15:26होमपेज › Vidarbha › यवतमाळ : कंदुरीच्या जेवणातून विषबाधा; बालिकेचा मृत्यू 

यवतमाळ : कंदुरीच्या जेवणातून विषबाधा; बालिकेचा मृत्यू 

Last Updated: May 22 2020 4:46PM

संग्रहीक छायाचित्रकासोळा (यवतमाळ) : प्रतिनिधी

महागाव तालुक्यातील कासोळा येथे कंदुरीच्या जेवणातून २६ जणांना विषबाधा झाली असून एका १५ वर्षीय बालिकेचा गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. अश्विनी बिनोद जाधव असे मृत बालिकेचे नाव आहे. यामुळे कासोळा गावात भीतीचे वातावरण बनले असून बालिकेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कंदुरी आयोजकांवर पुसद ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

गोंदियात एकाच दिवशी २६ नवे रुग्ण!

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कासोळा येथे १९ मे रोजी राजू हरचंद राठोड व वसंत हरचंद राठोड यांनी कंदुरीचे जेवण आयोजित केले होते. या जेवणानंतर २६ जणांना बुधवारी सायंकाळी उलटी, मळमळ, आदी त्रास सुरु झाला. त्यामुळे हे २६ जण गुरुवारी पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले गेले. प्राथमिक उपचारानंतर यातील २४ जणांना सुटी देण्यात आली असून उर्वरित दोघे पुसदच्या खासगी रुग्णालयात दाखल झाले. गावी परतलेल्या २४ पैकी अश्विनी जाधव हिची प्रकृती गुरुवारी रात्री खालावली. त्यातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात कंदुरीचे जेवण आयोजित केल्याबद्दल पुसद ग्रामीण पोलिसांनी राजू हरचंद राठोड (वय ५५) व वसंत हरचंद राठोड (वय ५१) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.