Fri, Mar 22, 2019 05:36
    ब्रेकिंग    होमपेज › Vidarbha › लग्‍नाच्या काही मिनिटे आधीच नवरी पसार

लग्‍नाच्या काही मिनिटे आधीच नवरी पसार

Published On: Dec 06 2017 9:19AM | Last Updated: Dec 06 2017 9:19AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

लग्न मंडपात वरासोबत फेरे घेताना पळून गेलेली पिया (करिना कपूर) तुम्ही थ्री इडियट्स चित्रपटात पाहिली असेल. पण, असाच प्रकार आता प्रत्यक्षात घडला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावी हा प्रकार घडला असून, मंगलाष्टकांच्या काही मिनिटे आधी वधूने आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकल्याने वऱ्हाडी मंडळीचीं पंचाईत झाली.

आर्वी येथे नवरदेव गजानन पुरुषोत्तम कळसकार (रा. आर्वी) व नवरी अंजली काशीनाथ थोरात (रा. यवतमाळ) यांचा विवाह संपन्‍न होणार होता. विवाहाची संपूर्ण तयारी झाली होती. पाहुणे मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होती. पण, अक्षता समारंभाला काही मिनिटे बाकी असताना अंजलीने मंडपातून धूम ठोकली. या प्रकारामुळे लग्न मंडपात मात्र गोंधळ उडाला.