Thu, Nov 15, 2018 08:14होमपेज › Vidarbha › नागपुरात सामूहिक बलात्कार करून डोळे फोडले

धक्कादायक; सामूहिक बलात्कार करून डोळे फोडले

Published On: Aug 15 2018 2:04AM | Last Updated: Aug 15 2018 2:04AMनागपूर : वार्ताहर

महिलेवर 4 नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिचे डोळे दगडाने ठेचल्याची खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात  मंगळवारी घडली. याप्रकरणातील चारही आरोपी ट्रक चालक आहेत. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिला मूळची मध्यप्रदेश येथील आहे. तिचे आजोबा उमरेड तालुक्यातील हेवती येथे वास्तव्याला आहेत. हेवती येथील शेती वेकोलित समाविष्ट केल्यानंतर सदर महिलेला वेकोलि येथे नोकरी मिळाली. सुमारे एक वर्षापासून गोकुल खदान येथे लिपिक पदावर कार्यरत होती. या महिलेने दुपारच्या सुटीत भोजन केले. त्यानंतर ती शौचालयाकडे गेली. तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या चौघांनी तिचा पाठलाग केला. तिला गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला.  काही वेळेनंतर एक वृद्ध ट्रकचालक या परिसरातून जात असताना महिलेचा किंचाळण्याचा आवाज आला. शौचालयाकडे धाव घेताच अतिशय गंभीर परिस्थितीत रक्‍तबंबाळ अवस्थेत महिला विव्हळत होती. लागलीच या वृद्धाने कार्यालयाकडे धाव घेत संपूर्ण प्रकार सांगितला आणि प्रकार उघडकीस आला.