Fri, Jul 19, 2019 07:05होमपेज › Vidarbha › तीन जहाल नक्षलवाद्यांचे गडचिरोलीत आत्मसमर्पण

तीन जहाल नक्षलवाद्यांचे गडचिरोलीत आत्मसमर्पण

Published On: Dec 25 2017 1:17AM | Last Updated: Dec 25 2017 1:17AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

गडचिरोली व छत्तीसगडमधील विविध दलम्मध्ये कार्यरत तीन जहाल नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. सतीश ऊर्फ हिळमा कोसा होळी, पाकली ऊर्फ पगणी अडमू पोयामी व मनोज ऊर्फ दशरथ सखाराम गावडे अशी आत्मसमर्पण करणार्‍यांची नावे आहेत. सतीश हा भामरागड दलम्मध्ये कार्यरत होता. ऑगस्ट 2014 मध्ये तो मोपस दलम् (दक्षिण बस्तर) मध्ये भरती झाला.

तेथे फेब्रुवारी 2015 पर्यंत कार्यरत होता. मार्च 2015 मध्ये त्याची मोपस दलम्मधून भामरागड दलम्मध्ये बदली झाली. ऑक्टोबर 2017 पर्यंत तो या दलम्मध्ये कार्यरत होता. कुरेनार (छत्तीसगड)कडे जाणार्‍या रस्त्यावर अ‍ॅम्ब्युश लावून चकमक घडवून आणणे, गुंडूरवाही येथील चकमक व अन्य गंभीर गुन्ह्यांत त्याचा सहभाग होता. शासनाने त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.