Wed, Feb 20, 2019 22:58होमपेज › Vidarbha › टेम्पोला अपघात; रस्त्यावर फ्रुटीची बरसात

टेम्पोला अपघात; रस्त्यावर फ्रुटीची बरसात

Published On: May 05 2018 1:10PM | Last Updated: May 05 2018 1:10PMलातूर। प्रतिनिधी

लातूर-नांदेड हायवेवर  शनिवारी सकाळी 11 वाजता वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकची व फ्रुटीच्या  टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात टेम्पो पलटी झाला व त्यातील फ्रुटीचे खोके रस्त्यावर विखुरली. कुणी पिशव्यानी, कुणी गोन्यानी तर अनेकांनी गाडीच्या डीग्गीत फ्रुटी भरून नेल्या. 

टेम्पो नांदेडकडे तर ट्रक लातूरकडे भरधाव वेगात जात होते. ही दोन्ही वाहने नांदगाव पाटी नजीक आली असता चालकांचे वाहनवरील नियंत्रण सुटले व ती एकमेकास धडकली. यात टेम्पो पलटी होऊन रस्त्याकडेला फेकला गेला. केबिन चेपली न गेल्याने चालकाचा जीव वाचला. त्यास नागरिकांनी बाहेर काढले. ट्रक चालक व वऱ्हाडही बचावले. अपघाताचे वृत्त कळताच अनेकांनी अपघातस्थळी धाव घेतली. वऱ्हाड दुसऱ्या वाहनाने निघून गेले. रस्त्यावर पडलेले फ्रुटीचे खोके उचलण्यास नागरिकांनी एकाच गर्दी केली होती.