होमपेज › Vidarbha › आणीबाणीतील बंदिंना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा : मुख्यमंत्री 

आणीबाणीतील बंदिंना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा : CM

Published On: Dec 22 2017 12:22PM | Last Updated: Dec 22 2017 1:34PM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी 

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात लावण्यात  आलेल्या आणीबाणीच्या विरोधात लढताना बंदिवास भोगलेल्या बंद्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. 

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पाँईंट ऑफफ इंफरमेशनच्या माध्यमातू आणीबाणीतील बंदिंना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा व सवलती देण्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्‍यांनी  आणीबाणीमुळे स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आली. त्यामुळे आणीबाणी विरोधातील लढा हा दुसरा स्वातंत्र्य लढाच होता. अनेक जणांनी बंदिवास भोगला. त्यामुळे या लढ्यात बंदिवास भोगणार्‍यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिले, पण त्यावर कार्यवाही झाले नसल्याचेही त्‍यांनी सांगितले. 

त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, अन्य सात ते आठ राज्यात आणीबाणीत तुरूंगवास भोगणार्‍यांना असा दर्जा देण्यात आला आहे. तेथे त्यांना पेन्शनही मिळते. राज्य सरकारने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशकडून त्यासबंधी माहिती घेतली आहे. राज्य सरकारनेही राज्यात बंदिवास भोगणार्‍यांची माहिती घेतली असून प्रस्तावही तयार केला आहे. जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात होणार्‍या पहिल्या मंत्री मंडळ बैठकीत यासबंधी निर्णय घेऊ.