Mon, May 27, 2019 09:56होमपेज › Vidarbha › उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव घेतील : एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव घेतील : एकनाथ शिंदे

Published On: Dec 13 2017 2:37AM | Last Updated: Dec 13 2017 2:27AM

बुकमार्क करा

नागपूर :

राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.  राज्य सरकारमधील शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव भाजपकडून शिवसेनेला मिळण्याची शक्यता असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. या संदर्भात पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, या संदर्भातला निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील.