Sun, Aug 25, 2019 19:15होमपेज › Vidarbha › अपात्र लोक महत्त्वाच्या पदावर

अपात्र लोक महत्त्वाच्या पदावर

Published On: Feb 05 2018 2:04AM | Last Updated: Feb 05 2018 1:39AMजळगाव  : प्रतिनिधी

ज्यांची पात्रता नाही असे लोक आज राजकारणात महत्त्वाच्या पदावर आहेत. तर पात्रता असणारे बाहेर असल्याची टीका माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. त्यांचे हे वक्‍तव्य स्वकीयांचा समाचार घेणारे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पाडळसे (ता. यावल) येथे भोरगाव लेवा पंचायतीच्या वतीने आयोजित लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात ते बोलत होते. यावेळी रमेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महापौर ललित कोल्हे, डॉ. ए. जी. भंगाळे उपस्थित होते.

विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव द्या!

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यायला हवे. बहिणाबाई चौधरी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे. केवळ लेवा पाटील म्हणून नव्हे, तर संपूर्ण समाज म्हणून विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देण्यात यावे, असा ठराव माजी मंत्री खडसे यांनी मांडला. तसेच संत तुकडोजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांची नावे दिली गेली आहेत. त्यांच्याइतके तोडीचे काम बहिणाबाईंचे असून, त्यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचेही आ. खडसे यांनी सांगितले.