Thu, May 28, 2020 18:43होमपेज › Vidarbha › ‘त्या’ मागण्या पूर्ण करा; खडसेंचा सरकारला घरचा आहेर

‘त्या’ मागण्या पूर्ण करा; खडसेंचा सरकारला घरचा आहेर

Published On: Dec 15 2017 6:08AM | Last Updated: Dec 15 2017 6:08AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

विरोधी पक्षात असताना आपण खूप मागण्या केल्या. आता सत्तेत आलो आहोत तर त्या पूर्ण करा. आता आपली जबाबदारी वाढली आहे हे विसरु नका, या शब्दात भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील रोजगार हमीची कामे निधी अभावी प्रलंबित असल्याचा तारांकित प्रश्‍न आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला होता. या प्रश्‍नावर विधान सभेत चर्चा सुरू असताना खडसे बोलत होते. रोजगार हमीची कामे निधी अभावी कशी रखडतात, त्या योजना या ग्रामीण भागातील शेत मजुरांना रोजगार मिळवून देण्याचे प्रभावी माध्यम आहे. शेतमजुरांना अकुशल कामगारांचा दर्जा असल्याने त्यांना भत्ते दिले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.