Thu, Jun 20, 2019 20:46होमपेज › Vidarbha › विधान परिषदेत विरोधकांचा सभात्याग

विधान परिषदेत विरोधकांचा सभात्याग

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 15 2017 12:37AM

बुकमार्क करा

नागपूर :

राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय खासगी शाळांना देय असलेले 20 टक्के अनुदान वेळेत न मिळणे, त्यासाठी शिक्षकांनी सुरू केलेले आंदोलन अशा विविध विषयांना स्पर्श करणारी विधान परिषद नियम 289 अन्वये प्रस्तावित चर्चा सभापती रामराजे निंबाळकर यांनी फेटाळून लावल्याने संतप्त झालेल्या शिक्षक आमदारांनी विधान परिषदेत आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी करीत सभागृहाचे कामकाज रोखून धरले. परिणामी, विधान परिषद दोनदा तहकूब करावी लागली. यावेळी घोषणा देत विरोधकांनी सभात्यागही केला.