Fri, Jul 19, 2019 00:55होमपेज › Vidarbha › सत्तेला लाथ मारायला गाढव शिकवेल; मुंडेंचा शिवसेनेला टोला 

सत्तेला लाथ मारायला गाढव शिकवेल; मुंडेंचा शिवसेनेला टोला 

Published On: Feb 21 2018 3:53PM | Last Updated: Feb 21 2018 3:52PMजळगाव : पुढारी ऑनलाईन 

हल्लाबोल यात्रेतून सरकारवर राष्ट्रीवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेवरही जोरदार टीकास्त्र सोडले. धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला गाढव देणार असून शिवसेनेने गाढवाकडून सत्तेला लाथ कशी मारायची ते शिकावे असा सणसणीत टोला लगावला. जळगाव येथे आयोजित हल्लाबोल यात्रेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.  

मुंडे म्हणाले की, आमच्या भाषणाचे वाक्य पूर्ण होण्याआधीच दुसरं वाक्य लोकं बोलत आहेत. इतका प्रचंड विरोध याआधी आम्ही पाहिला नव्हता. भाजप, मोदी आणि त्यांची आश्वासनं आता चौकाचौकात चेष्टेचा विषय बनला आहेत. 

देशभरात सुरू असणाऱ्या पीएनबी बँक घोटाळ्यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला. ‘पंतप्रधान मोदी म्हणाले होते, मी पंतप्रधान नाही तर या देशाचा चौकीदार आहे. मग मल्ल्या, मोदी हजारो कोटी रूपये घेऊन पळाले तेव्हा चौकीदार काय करत होते?’ असे मुंडे म्हणाले. 

उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनादरम्यान धरणगाव येथील सभेची सुरूवात शेतीचे प्रतिक असलेल्या नांगराचे पूजन करून व नांगर उचलून झाली. यावेळी  ‘राज्यात बळीचं राज्य यावं यासाठी आम्ही बळीराजाच्या नांगराचे पूजन केले. भाजपच्या सत्तेचे तण हा बळीराजाचा नांगरच आता उखडून फेकेल’, असेही धनंजय मुंडे म्हणाले.