होमपेज › Vidarbha › प. म. देवस्थान समिती गैरव्यवहाराची चौकशी करा

प. म. देवस्थान समिती गैरव्यवहाराची चौकशी करा

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 18 2018 1:50AMनागपूर : प्रतिनिधी

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी एसआयटी चौकशी नेमून, सहा महिन्यांत भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली होती; पण या आश्‍वासनास सव्वाचार वर्षांचा कालावधी उलटूनही त्याची पूर्तता होत नाही आहे. भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे देवस्थान समितीच्या जमिनी आणि दागिन्यांवर डल्ला मारणार्‍यांवर तातडीने कारवाई करा, या मागणीसाठी विधानभवनाच्या दारात आंदोलन करण्यात आले. 

आमदार राजेश क्षीरसागर यांनी, देवस्थान समितीत भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी केलेली एसआयटी नेमणुकीची घोषणा हवेतच काय?, देवस्थानच्या जमीन आणि दागिन्यांच्या घोटाळ्याचे झाले तरी काय? अशा घोषणा देत फलक घेऊन विधानभवनात प्रवेश करून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले.  यावेळी आमदार राजन साळवी, भरतशेठ गोगावले, प्रकाश आबीटकर, वैभव नाईक, बालाजी किणीकर, शांताराम मोरे, तुकाराम काते, सदानंद चव्हाण, अमित घोडा आदी उपस्थित होते.