Sun, Aug 18, 2019 20:52होमपेज › Vidarbha › राज्यात गुन्ह्यांध्ये मोठ्या प्रमाणात घट : मुख्यमंत्री

माझ्यावर आरोप करा, पण नागपूरला बदनाम करू नका

Published On: Dec 23 2017 11:53AM | Last Updated: Dec 23 2017 11:53AM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी

राज्यात मागील काही वर्षात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाली असून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्यात संपूर्ण नियंत्रण आहे. तुलनेने कमी झालेले गुन्हे आणखी कमी करुन महाराष्ट्र महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह सर्वच नागरिकांसाठी पूर्णत: सुरक्षित बनविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. गृह विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या व्यापक उपाययोजनांचे फलस्वरुप म्हणून राज्यात विविध गुन्ह्यांध्ये झालेल्या घटीची आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी यावेळी सादर केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदींनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात खुनाच्या गुन्ह्यांध्ये 13.49 टक्क्यांनी, बलात्काराच्या गुन्ह्यांत 3.6 टक्क्यांनी, दरोड्यांध्ये 2.46 टक्क्यांनी, दंगलीच्या गुन्ह्यात 3.15 टक्क्यांनी तर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात 8.90 टक्क्यांनी घट झाली आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार कोणत्याही गुन्ह्यांध्ये महाराष्ट्राचा पहिल्या 5किंवा 6 व्या क्रमांकात समावेश नाही. या अहवालानुसार दखलपात्र गुन्ह्यांध्ये महाराष्ट्राचा देशात तेरावा क्रमांक लागतो. महाराष्ट्र राज्य हे क्राई कॅपीटल होतेय असे म्हणणे पुर्णत: चुकीचे आहे. कोणत्याही अहवालामध्ये असे दिसून येत नाही, असे त्यांनी सांगितले . त्याचवेळी महिलांवरील विनयभगाच्या गुन्ह्यात वाढ झाल्याची कबुली त्यांनी दिली.

माझ्यावर आरोप करा, पण नागपूरला बदनाम करू नका

मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर शहरातही गुन्ह्यांध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. खुनाच्या घटना उणे 3, खुनाचा प्रयत्न उणे 10, दरोडा उणे 16, चेन स्नॅचिंग उणे 30, अपहरण उणे 12 अशा पद्धतीने नागपुरात गुन्हे कमी झाले आहेत. नागपूर हे औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसीत होत असलेले शहर आहे. त्यामुळे क्राईम कॅपीटल म्हणून या शहराची बदनामी करणे योग्य नाही. हवे तर माझ्यावर आरोप करा पण नागपूरला बदनाम करू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सोशल मीडिया हे पूर्णत: खुले माध्यम आहे. त्याच्या वापरासाठी नागरिकांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र गैरवापर करुन कोणी दंगली घडविण्याचा प्रयत्न केल्यास त्याप्रकरणी निश्‍चित कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण 8 वरून 34 टक्क्यांवर

राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढले असून सध्या हे प्रमाण साधारण 34.08 टक्क्यांपर्यंत गेले आहे. 2008 मध्ये हे प्रमाण फक्त 8 टक्के इतके होते. प्रत्येक जिल्ह्याला फिरते फॉरेन्सिक युनिट देण्यात आले आहे. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम पुराव्यांची चाचपणी करता येत आहे. पोलीस दलातर्फे प्रतिबंधात्मक उपायांध्येही वाढ करण्यात आली आहे. 5 हजार 283 इतक्या अधिकच्या प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. 1 हजार 304 इतक्या हद्दपारीच्या तर 188 इतक्या एमपीडीएच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळेही गुन्हेगारी रोखण्यात यश आले आहे, असे ते म्हणाले.