Sat, Jul 04, 2020 07:45होमपेज › Vidarbha › अकोल्यात एकाच दिवशी ३० कोरोनाबाधित

अकोल्यात एकाच दिवशी ३० कोरोनाबाधित

Last Updated: May 27 2020 1:37PM

संग्रहित छायाचित्रअकोला : पुढारी वृत्तसेवा 

विदर्भातील अकोला शहरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी प्राप्त अहवालानुसार ३० नविन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामध्ये २० पुरूष व १० महिला रूग्णांचा समावेश आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ४६५ वर पोहोचली आहे.

यापैकी २८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २८ रूग्ण उपचारादरम्यान मृत झाले असून १४८ रूग्णांवर अकोला कोविड रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती शासकीय वैद्यकिय महाविद्यालय अकोलाच्या सुत्रांनी दिली आहे.