Thu, Jan 17, 2019 00:13होमपेज › Vidarbha › विरोधी पक्षांच्या संयुक्त जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा (Video)

विरोधी पक्षांच्या संयुक्त जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा (Video)

Published On: Dec 12 2017 2:20PM | Last Updated: Dec 12 2017 2:29PM

बुकमार्क करा


नागपूर : पुढारी ऑनलाईन

राज्य सरकार विरोधात विरोधी पक्षांच्या संयुक्त जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाला सुरूवात झाली. विरोधी पक्षांनी एकत्र येत विधान भवनावर मोर्चा काढला आहे. यावेळी विरोधी पक्षांतील नेत्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चामध्ये काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांचे आगमन झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी  (कवाडे गट) या पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला असून या पक्षांचे  हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभाग झाले आहेत. 

कालपासून सुरू झालेल्या हिवाळी आधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर पलटवार केले होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून, सरकारविरोधरात घोषणाबाजीही केली होती. आज, सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा काढून विरोधी पक्षांनी लक्ष वेधले आहे.