Sun, Sep 23, 2018 23:24होमपेज › Vidarbha › चीनच्या विमानांचे नागपुरात लँडिंग

चीनच्या विमानांचे नागपुरात लँडिंग

Published On: Jan 02 2018 9:10AM | Last Updated: Jan 02 2018 9:10AM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

उत्तर भारतात दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याचा मोठा फटका विमान सेवेला बसला. दिल्ली विमानतळावर सकाळी उतरणार्‍या अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आल्याने चायना साऊथर्न, फ्लाय दुबई आणि गो-एअर या तीन कंपन्यांच्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 8.30 ते 9 या वेळेत आकस्मिक लँडींग करण्यात आले. चीनचे चायना साऊथर्न एअरलाईन्सचे विमान क्वांगचो दिल्लीला उतरणार होते, पण कमी दृष्यमानतेुळे ते सकाळी नागपूर विमानतळावर उतरविण्यात आल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकार्‍यांनी दिली. याशिवाय फ्लॉय दुबई कंपनीचे दिल्ली येथे उतरणारे आणि गो-एअरचे हैदराबाद-दिल्ली विमान नागपूर विमानतळावर उतरले. या तिन्ही विमानांनी दीड तासाच्या अंतराने दिल्लीला उड्डाण भरले.