Thu, Nov 15, 2018 05:21होमपेज › Vidarbha › नक्षलवाद्यांपासून धोका : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ

नक्षलवाद्यांपासून धोका : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ

Published On: May 25 2018 1:37AM | Last Updated: May 25 2018 1:37AMनागपूर ः प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांना नक्षलवाद्यांपासून धोका असल्याच्या इशार्‍यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशार्‍यानंतर पोलिसही सतर्क झाले आहेत.

सुकमा येथील हल्ल्यानंतर दिल्ली येथे नक्षलवादग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘फ्रंटल’चा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर देशभरात फ्रंटलवर कारवाई करण्याचे धोरण आखण्यात आले. काही दिवसांपूर्वी राज्यात पोलिसांनी फ्रंटल सदस्यांच्या घरावर छापे टाकले होते. एप्रिल महिन्यात गडचिरोली येथे दोन चकमकी झाल्या. या चकमकीत सी- 60च्या जवानांनी 40 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. या घटनेचा बदला घेण्याच्या तयारीत नक्षलवादी असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना धोका होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.