Sat, Jan 19, 2019 02:23होमपेज › Vidarbha › सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र, राज्याचे साडेतेरा हजार कोटी : मुख्यमंत्री

सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र, राज्याचे साडेतेरा हजार कोटी : मुख्यमंत्री

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 12 2017 1:17AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर सिंचन हाच एकमेव उपाय आहे. येत्या दोन वर्षांत केंद्र आणि राज्य शासनांच्या वतीने 13,500 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अपूर्ण प्रकल्प वेगाने पूर्ण होऊन सिंचन क्षेत्र वाढविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘रामगिरी’ येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिकार्‍यांची सिंचनाच्या संदर्भात एकत्रित आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

बैठकीला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी तसेच जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्‍त अनुपकुमार, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल आदी उपस्थित होते.