Sun, May 26, 2019 12:37होमपेज › Vidarbha › भाजपाविरोधात राज्यात दहा पक्षांची महाआघाडी : अशोक चव्हाण

‘भाजपाविरोधात राज्यात दहा पक्षांची महाआघाडी’

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 1:35AMनागपूर : प्रतिनिधी

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात दहा समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

विधानपरिषदेच्या उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी चव्हाण नागपुरात आले होते. प्रेस क्लब तर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली़ ते म्हणाले, ‘‘महाआघाडीसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत तीन बैठका झाल्या आहेत. लवकरच राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता भाजपाविरोधी असणार्‍या दहा छोट्या पक्षांना सोबत घेत महाआघाडी निर्माण करण्यात येणार आहे.  राज्यातील कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी आदी विषयाला स्पर्ष करीत चव्हाण यांनी सरकारवर ताशेरे ओढले. सरकारने 18 टक्के कर्जाचे वाटप राज्यात केले आहे. शेतकर्‍यांजवळ पेरणीसाठी पैसे नाहीत. सरकारने
शेतकजयांना दिलासा देण्यासाठी त्वरीत अंमलबजावणी करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरातच गुन्हेगारी वाढली आहे. शंभर दिवसात येथे 63 खून होतात, ही गंभीर बाब आहे. विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना शेतमालकाने मारहाण केली. तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर राहूल गांधी प्रतिक्रिया देताच त्यांना नोटीस पाठविण्यात आली. आरोपीला पकडण्याऐवजी सरकारचे लक्ष मुद्दा उचलणाऱ्यांवर कारवाई केली जाते.