Fri, Apr 26, 2019 03:39होमपेज › Vidarbha › ‘काँग्रेस, राष्ट्रवादी विषारी कीटकनाशके’

‘काँग्रेस, राष्ट्रवादी विषारी कीटकनाशके’

Published On: Dec 12 2017 10:43AM | Last Updated: Dec 12 2017 10:43AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी भाजप आणि शिवसेनेला शेतातील रोगांची नावे दिली आहेत. आम्ही रोग जरूर असू पण त्याचवेळी काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रस हे पक्ष जीवघेणी विषारी कीटकनाशके आहेत याची जाणीव जनतेने ठेवावीअशी घणाघाती टीका शिवसेना प्रतोद आणि प्रवक्त्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.

विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेमुळेच ज्यांना व त्यांच्या पिताश्रींनादेखील मंत्रिपदे मिळाली, त्यांनी शिवसेनेवर अशा पद्धतीने मत मांडणे म्हणजे खालच्या पातळीला जाऊन राजकारण करणे आहे, अशी टीका त्यांनी केली.


हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ
विधान परिषदेत नौटंकीच्या आरोपावरून गोंधळ