Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Vidarbha › वाहनाच्या धडकेत ठार झालेला वाघ ‘बाजीराव’च

‘बाजीराव’चाच वाहनाच्या धडकेत मृत्यू

Published On: Dec 31 2017 8:28AM | Last Updated: Dec 31 2017 8:28AM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

हिंगणा येथील बाजारगावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 29 डिसेंबर रोजी एका तरुण वाघाचा मृत्यू झाला होता. तो वाघ नेमका कुठून आला होता, याची शहानिशा सुरू होती. मात्र, तो वाघ वर्धा जिल्ह्यात सेलु तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात वावरणारा ‘बाजीराव’ असल्याचे उघड झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बाजीराव गेल्याने व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येत घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. येथे वाघ पाहायला येणार्‍या पर्यटकांमुळे येथे छोटे-मोठे व्यवसाय उभे राहिले होते. या व्यावसायिकांमध्ये आता चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच, वाघ दर्शनाच्यानिमित्ताने येथे पर्यटकांचा ओघ वाढल्याने वन विभागाने प्रवेश शुल्क आदीतही दुपटीने वाढ केली होती. त्यामुळे सरकारी पातळीवरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.