Thu, Jun 27, 2019 18:08होमपेज › Vidarbha › मागासवर्गीय शिष्यवृत्ती अपहार; ७० संस्थांवर गुन्हे दाखल होणार

मागासवर्गीय शिष्यवृत्ती अपहार; ७० संस्थांवर गुन्हे दाखल होणार

Published On: Dec 14 2017 1:48AM | Last Updated: Dec 14 2017 1:11AM

बुकमार्क करा

नागपूर : उदय तानपाठक

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या मॅट्रिकोतर शिष्यवृत्तीच्या रकमेत गैरव्यवहार करणार्‍या 70 संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यांच्याकडून गैरव्यवहार झालेल्या रकमेची वसुली सुरू आहे. या संस्थांनी 28 कोटी 30 लाख रुपयांचा अपहार केला असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत दिली. यापैकी 16 संस्था एका सोलापूर जिल्ह्यातील आहेत. 

हसन मुश्रीफ, अजित पवार, शशिकांत शिंदे, नरहरी हिरवाळ आदी आमदारांनी यासंदर्भात प्रश्‍नोत्तरांच्या तासात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रश्‍नाला लेखी उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्र्यांनी म्हटले आहे, की 70 संस्थांनी 28 कोटी 30 लाख रुपयांचा गैरव्यवहार शिष्यवृत्ती प्रकरणात केला असून त्यांच्याविरोधात गुनहे दाखल करण्याची शिफारस विशेष चौकशी पथकाने केली आहे. मात्र, न्यायालयांनी स्थगिती आदेश दिल्याने हे गुन्हे दाखल केलेले नाहीत. मात्र, या संस्थांकडून समाजकल्याण खात्याच्या सहायक आयुक्‍तांकडून वसुलीची कारवाई सुरू झाली आहे, असे बडोले यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.