Wed, Mar 27, 2019 06:01



होमपेज › Vidarbha › मुख्यमंत्र्यांनी पत्राची दखल न घेतल्याने देशमुख अडचणीत

मुख्यमंत्र्यांनी पत्राची दखल न घेतल्याने देशमुख अडचणीत

Published On: Jan 04 2018 8:02AM | Last Updated: Jan 04 2018 9:31AM

बुकमार्क करा




नागपूर : प्रतिनिधी

भाजपचे बंडखोर आमदार आशिष देशमुख यांनी भाजपवरची नाराजी लपवून ठेवली नसून त्यांचे भाजपशी तीन वर्षांपूर्वी जुळलेले नाते आता तुटल्यात जमा आहे. काँग्रेसमध्ये येऊन ते सावनेर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढण्याची तयारी करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या सात पानी पत्राची मुख्यमंत्र्यांनी फारशी दखल न घेतल्यामुळे देशमुख अडचणीत सापडले आहे. देशमुख यांनी आता थेट भाजपवर हल्ला करणे सुरू केले आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे सुपुत्र असलेले आशिष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब काँग्रेस विचारसरणीचे राहिले आहे. या नोटीसचे त्यांनी अद्याप उत्तर दिले नाही. त्यामुळे भाजपच्या या नोटीसला आपल्या लेखी किमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दीड-दोन वर्षांनंतर त्यांचा भाजपमध्ये भ्रनिरास व्हायला सुरुवात झाली. भाजपच्या कार्यक्रमांना जाणेही त्यांनी बंद केले. हा दुरावा गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या काळात अधिक वाढला. देशमुखांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या अभ्यास वर्गाला हजेरी न लावल्याने भाजपने नोटीस बजावली. ही बाब त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली.